मालेगाव तालुका पोलीसाची धडाकेबाज कारवाई…मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरमधून गेली ५३ गायीची सुटका…पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी व त्यांच्या टीमने केली कारवाई..
मालेगाव तालुका पोलीसाची धडाकेबाज कारवाई…मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरमधून गेली ५३ गायीची सुटका…पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी व त्यांच्या टीमने केली कारवाई..
मालेगाव(विजय धामणे) :- मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील देवरपाडा शिवरात पोलीस निरीक्षक प्रितमकुमार चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल ग्रीन प्लाझा समोर एका कंटेनरवर कारवाई करण्यात आली यातुन जवळपास ५३ गायीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असुन कंटेनर क्रमांक एच आर 67 बी 3613 मधून या गायीची सुटका करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलमानुसार आणि प्राणी क्रुरता निवारण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली असुन आरोपींकडुन बनावट नंबर प्लेट लावून पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला असुन आज या कारवाईतुन तब्बल 53 जनावरांना वाचवण्यात यश आले आहे.या कारवाईचा अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच गोरक्षक संस्थानी स्वागत करत पोलिसांचे अभिनंदन केले आहे.या धाडीत पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्यासोबत उपनिरीक्षक तुषार भदाणे,सहायक उपनिरीक्षक रमेश पवार,हवालदार प्रकाश बनकर, अमोल शिंदे,
पोलिस नाईक हेमंत देवरे आणि शिपाई सूर्यकांत मोरे यांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका बजावली तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक फुलमाळी करत आहेत.