भविष्यासाठी इंधन वाचवणे ही काळाची गरज ;सोमनाथ घोलप


भविष्यासाठी इंधन वाचवणे ही काळाची गरज ;सोमनाथ घोलप
मनमाड(प्रतिनिधी):- आजच्या तरूणाईसह देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या भावी पिढीसाठी इंधन वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे इंधन वाचवणे ही काळाची गरज असुन आठवड्यात एक दिवस का होईना नो व्हेईकल डे अर्थात कोणत्याही प्रकारची खासगी वाहना न वापरता शक्य असल्यास पायी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा जेणेकरून प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल व इंधनाची बचत होईल असे मत सहायक मोटार वाहन निरीक्षक सोमनाथ घोलप यांनी व्यक्त केले मनमाड येथे आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनमाड आगारप्रमुख विक्रम नागरे हे होते.
                 उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव  मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा 2025 व इंधन बचत 2025 अंतर्गत राज्य परिवहन महामंडळ मनमाड आगार येथे कार्यकम घेण्यात आला होता यावेळी घोलप बोलत होते यावेळी त्यांनी आजच्या तरूणाईने व देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या भावी पिढीसाठी इंधन बचत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे याशिवाय आठवड्यात एक दिवस तरी नो व्हेईकल डे साजरा करावा जेणेकरून इंधनाची बचत होईल यासह रस्त्यावर चालताना आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यांत येणार नाही याची काळजी घेऊन वाहन चालवावे असेही घोलप यांनी सांगितले. यावेळी राज्य परिवहन कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!