नांदगावला कॉपी बहाद्दर जीव धोक्यात घालुन पुरवताय कॉपी.. शालेय प्रशासनाची डोळेझाक…
नांदगावला कॉपी बहाद्दर जीव धोक्यात घालुन पुरवताय कॉपी..? शालेय प्रशासनाची डोळेझाक…
नांदगाव( प्रतिनिधी):- आपल्या पाल्याला चांगले मार्क मिळावे म्हणून अनेक पालक चांगल्या कोचिंग क्लासेस मध्ये पाठवतात काही जण एक्स्ट्रा क्लास लावतात मात्र काहीजण केवळ आपल्या पाल्याला चांगल्या प्रकारे कॉपी पुरवतात यासाठी ते स्वतःचा जीव देखील धोक्यात घालतात.असाच काहीसा प्रकार नांदगाव येथील व्हिजे हायस्कूल मध्ये घडतो आहे आणि याकडे शालेय प्रशासनाचे देखील दुर्लक्ष असल्याचे समोर येत आहे.कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः चालू विजेच्या खांबावर देखील विद्यार्थी व पालक चढत आहे याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडीओला बघुन तरी शिक्षण विभागाने हा प्रकार थांबवावा व काही दुर्घटना घडू नये यासाठी पावले उचलावी तसेच सबंधित शालेय प्रशासनाला देखील जाब विचारावा अशी मागाणी करण्यात येत आहे.
चांगले शिक्षण मिळावे यासाठी अनेक पालक जीवाचे रान करतात आपला मुलगा चांगल्या मार्कांने पास व्हावा यासाठी वाटेल ते करतात मात्र नांदगाव शहरातील व्ही जे हायस्कूल मध्ये अनेक पालक आपल्या पाल्याला कॉपी पुरवण्यासाठी आपला जीव देखील धोक्यात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन कॉपी पुरवण्यासाठी काही विद्यार्थी हे चालू विजेच्या खांबावर चढताना दिसत असुन जर कॉपी देतांना एखाद्याला विजेचा धक्का(शॉक) लागला तर जीवावर बेतू शकते याकडे कुणाचेही लक्ष नाही विशेष म्हणजे या नामांकित शाळेतील शिक्षक व संस्था चालकांची याला मुकसंमती आहे की काय असा प्रश्न हा व्हिडीओ बघून उपस्थित केला जातो आहे.शालेय शिक्षण विभागाने देखील या व्हिडीओची शहानिशा करून कारवाई करावी जे दोषी असतील अशाना कठोर शासन करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.