मनमाडला वृद्ध महिलेचे एक लाख रुपये धूम स्टाईलने हिसकावून चोरटा फरार
मनमाडला वृद्ध महिलेचे एक लाख रुपये धूम स्टाईलने हिसकावून चोरटा फरार
मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरातील एका 58 रेल्वे पेंशनर महिलेचे सुमारे एक लाख रुपये चोरट्यांनी धूम स्टाईलने हिसकावून नेल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे घटना घडल्यानंतर सदर महिला व तिच्या मुलाने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी तात्काळ एक पथक रवाना करून त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीसाठी आदेश दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील बारसे बिल्डिंग या ठिकाणी राहणाऱ्या निशाबाई महेंद्र जाधव वय 58 वर्ष या महिलेने आपल्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातुन पेंशनवर एकलाख पाच हजार रुपये कर्ज घेतले होते ते पैसे घेऊन त्या रिक्षाने आपल्या घराकडे जात असतानाच मनमाड शहरातील इंदुर पुणे महामार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज वरून जात असतानाच त्यांच्या रिक्षा समोर इतर गाड्या आल्याने रिक्षा हळू झाली याचवेळी मागुन मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने जाधव यांच्या मांडीवर ठेवलेली बॅग घेऊन धूम स्टाईलने येवलयाच्या दिशेने पलायन केले जाधव यांनी व रिक्षा चालकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्याने धूम ठोकली जाधव यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तात्काळ पोलीस टीम पाठवुन सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीसाठी आदेश दिले यानंतर येवल्याच्या पोलिसांशी संपर्क साधला मात्र कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही मनमाड शहर परिसरात गुन्हेगारी वाढत चालली असुन पोलिसांनी यावर अंकुश लावावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.
होत नव्हतं सगळं गेलं…!माझ्या नवऱ्याची पेंशन मला मिळते यातुन आमचा उदरनिर्वाह चालतो मनमाड शहरात कामाची कमतरता असल्याने मुलगा मिळेल ते काम करतो पेंशनवर एक लाख पाच हजार कर्ज घेतले होते यातील एक लाख रुपये घेऊन घरी जात असतानाच मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने पैशाची पिशवी हिसकावून नेली यात माझे आधारकार्ड पॅनकार्ड बँक पासबुक घर खर्चाचे पैसे व बँकेतून काढलेले एक लाख रुपये होते हे सर्व घेऊन चोरटा पळून गेला यामुळे होत नव्हतं सगळं गेलं पोलिसांनी शहरात गस्त वाढवावी जेणेकरून इतरांसोबत असे घडू नये