नांदगाव विधानसभा संयोजकपदी शुभमबापू गायकवाड…!
नांदगाव विधानसभा संयोजकपदी शुभमबापू गायकवाड…!
मनमाड(अजहर शेख):- भारतीय जनता पक्षाच्या नांदगाव विधानसभा संयोजकपदी शुभमबापू गायकवाड यांची निवड करण्यात आली असुन भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ही नियुक्ती केली आहे.आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश संपादन करायचे आहे त्या दृष्टीने या नवीन नियुक्ती करण्यात येत आहे नांदगाव तालुका विधानसभा संयोजक म्हणून गायकवाड यांच्याकडे धुरा देण्यात आली आहे भविष्यात होणाऱ्या निवडणूकित मी प्रामाणिकपणे काम करून पक्षाचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करेल असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे या निवडीबद्दल गायकवाड यांचे सर्व थरांतून स्वागत करण्यात येत आहे.
