नांदगाव नगरपरिषदेद्वारा प्लास्टिक आणि नायलॉन मांजा बंदी मोहीम
नांदगाव नगरपरिषदेद्वारा प्लास्टिक आणि नायलॉन मांजा बंदी मोहीम
नांदगाव( महेश पेवाल ):- नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक आणि नायलॉन मांजा वापर यावर प्रतिबंधात्मक पथकाने आठवडे बाजारात, मांझा विक्री दुकानांवर तसेच पुलावर व इतर भागात छापा टाकण्यात आला. या कारवाईत भाजीपाला विक्रेत्यांना , फळ विक्रेत्यांना, त्याचबरोबर हातगाडी विक्रेत्यांना प्लास्टिक व नायलॉन मांझा. वापरू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल .अशी समज देण्यात आले. संबंधित व्यावसायिकांकडे प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा ५०००/- , त्यानंतर १०.०००/- हजार व तिसऱ्यांदा २५०००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे कर निरीक्षक प्रमोद पवार यांनी सांगितले व त्याचबरोबर पथकाचे इतर सदस्यही उपस्थित होते. तसेच व्यावसायिकांना प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा असे आव्हान मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी यावेळी
सहभागी कर्मचारी दीपक वाघमारे उमेश चंडाले सुनिल गुढेकर अरबाज बेग राहुल गुढेकर सचिन गुढेकर