विद्यार्थी सशक्तीकरण सोहळा संपन्न..
नाशिक(आवेश कुरेशी):- “विद्यार्थी सशक्तीकरण सोहळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने, असंख्य नागरीक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत “विद्यार्थी सशक्तीकरण सोहळा”मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस, नाशिकभूषण अमोल भागवत यांनी केले, आयोजन मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष अविनाश वाघ, दिपक वाघ आणि लोकप्रिय नगरसेवक हरिशभाऊ भडांगे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांना अचानक तातडीने आयोजित केलेल्या बैठकीमुळे जावे लागल्याने कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आर्टिलरी चे कर्नल मच्छिंद्र सिरसाट, जयरामभाई हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. सुनील जाधव, मनपा नगरसेवक हरिशभाऊ भडांगे, मनपा नगरसेविका जयश्रीताई खर्जुल, मनसे महिला शहराध्यक्ष अक्षराताई घोडके, भाजपा नेते, मा. नगरसेवक मधुसूदन गायकवाड, शिवसेना नेत्या, जनसेविका रोहिणीताई वाघ, हभप, साक्षीताई पळसकर, शिवसेना नेते योगेश भोर, विशाल कलेक्शन संचालक मयूरभाऊ गणोरे, निर्भीड ज्योत संचालिका आशाताई कर्डक मोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ करंजकर, शिवसेन नेते नितीन खर्जुल, शिवसेना नेत्या अस्मिता देशमाने, भाजप नेत्या सुषमाताई गोराणे, स्वराज्य पक्ष महिला उपाध्यक्ष रेखाताई जाधव, मनसे उपतालुकाध्यक्ष कैलासभाऊ भोर, जनसेवक दिपकभाऊ वाघ, जनसेवक रवीभाऊ वाघमारे, जनसेवक अनिल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. शिक्षण अधिकारी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे ठरल्याप्रमाणे आलेल्या यादीप्रमाणे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी भविष्यात कसे नियोजन करता येईल याबाबत लवकरच येत्या काळात चर्चा करण्यात येणार आहे.
कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी अतिशय नियोजनशील पद्धतीने नुतन विद्यामंदिर येथील शिक्षक ललित भदे सर यांनी सूत्रसंचालन केले तसेच रोहिणीताई वाघ, ज्योतीताई परदेशी, कीर्तीताई उदावंत, सविताताई आहेर, रमेशजी चेवले, दिलीप गायकवाड, संजय बलकवडे, सुभाष ठुबे, श्याम डावरे, दिनेश झुटे, तुकाराम हांडगे, अजय चव्हाण, पंडित मोरे, बिस्मिल्ला खान, अमित लोखंडे, किरण भाऊ पगारे, स्वप्निल वाघ, अरुण पगारे, सागर सोनकांबळे, सुरेश सातव, राहुल जमदाडे, साहिल अन्सारी, विनायक सोनवणे, सागर वाघ, मनोज वाघ, दहावीत सुतार समाधान पगारे, दिपाली वाघ, लताबाई गायकवाड, विशाल भाऊ जाधव यांनी विषेश परिश्रम घेतले.
कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते असलेल्या नासिक भूषण अमोल भाऊ भागवत यांनी विद्यार्थ्यांना पुनशहा प्रेरित केले मिल्खा सिंग तसेच अनेक महान व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या पद्धतीचे नियोजन केले आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश संपादन केले याविषयी सविस्तर माहिती दिली. मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष अविनाश वाघ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दोन विद्यार्थ्यांना रोख रक्कम म्हणून शिष्यवृत्ती सुद्धा दिली, त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरीब परिस्थिती असलेल्या निराधार विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजकांनी विद्यालयाकडून यादी मागून लवकरच त्यांची जबाबदारी घेण्यात येईल या पद्धतीने उपस्थितांना आश्वासन दिले.