ज्याचा जगात गाजावाजा भिमराव एकच राजा…! मनमाडला भिमजयंतीचा जल्लोष…!
ज्याचा जगात गाजावाजा भिमराव एकच राजा…!
मनमाडला भिमजयंतीचा जल्लोष…!
मनमाड(आवेश कुरेशी/अजहर शेख):- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रमासह सायंकाळी विविध चित्ररथ आणि आकर्षक देखावे यांच्या मिरवणुकीत भिमजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष बघायला मिळाला मनमाड हे आंबेडकर चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते शहरात मोठया प्रमाणात भिमजयंतीचा जल्लोष साजरा करण्यात येतो सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बिहार येथील महाबोधी महाविहारचा देखावा लावण्यात आला होता.शहरातील आणि ग्रामिण भागतील मिळुन जवळपास 63 चित्ररथ मिरवणूक काढण्यात आल्या होत्या.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मनमाड शहरात पूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोष साजरी करण्यात आली शहरातील जवळपास सगळ्यात वार्डातून व नऊ गावातून मिळून जवळपास 63 चित्ररथ मिरवणूक काढण्यात आल्या होत्या या सर्व मिरवणूक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आणुन विसर्जित करण्यात आल्या याठिकाणी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने या सर्व चित्ररथाचे स्वागत करण्यात आले सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद उबाळे व इतर कार्यकर्त्यांनी आलेल्या सर्व रथांचे स्वागत केले देशभरात सध्या बिहारीतील महाबोधी महाविहार बाबत आंदोलन चालू आहे या आंदोलनाला सपोर्ट म्हणून भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महाबोधी महाविहाराचा देखावा लावण्यात आला होता ज्याचा जगात गाजा वाजा भिमराव एकच राजा यासह इतर अनेक प्रेरणादायी गाण्यांवर तरुणाईने तसेच महिला व अबाल वृद्धांनी ठेका धरत आनंद उत्सव साजरा केला शहरातील सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय सरकारी कार्यालय नगरपालिका महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्रीय इंजिनिअरिंग वर्कशॉप यासह इतर अनेक शासकीय नियम शासकीय कार्यालयात व्याख्यान निबंध स्पर्धा गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांच्यासह तर विविध कार्यक्रम घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला
—————————— —————————— ——
मुस्लिम लायब्री व फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच
मुस्लिम लायब्ररी व फुले शाहू आंबेडकर विचार मंच संयुक्त विद्यमाने तर्फे आज रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमा चे अध्यक्ष कायदेतज्ञ वकील जावेद शेख होते. व प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस चे जेष्ठ नेते सुनील जी गवांदे सी टू युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ रामदास पगारे. होते यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जावेद वकील व सुनील गवादे यांनी फुल हार अर्पण केले यावेळी मुस्लिम विचार मंचाचे बेग चाचा. फिरोज शेख.अध्यक्ष प्रमुख पाहुणे याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारा वंर व संविधानावर भाषण झाले यावेळी मुस्लीम लायब्रर रीचे सेक्रेटरी अब्दुल कादर भाई यांनी कार्यक्रमा चे आयोजन केले डॉ ए जी कुरेशी. हाजी जानी सेठ. हाजी नजीर पठाण. अफरोज अत्तार नजमुल हुसेन मनसुरी जफर शेख सद्दाम अत्तार. सुरेश जगताप भीमानंद महीरे. विकास गायकवाड हजर होते कार्यक्रमाचे आयोजन एम सलीम यांनी केले.
—————————— —————————— ——
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ओओपन लाईन शाखा…!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, ओपन लाईन शाखा, मनमाड च्या वतीने साजरी करण्यात आली. युनियन कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला एकात्मता, संविधानिक मूल्यं आणि सामाजिक समतेचा प्रेरणादायी संदेश लाभला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉ. शबरीश नायर यांनी भूषविले आणि सूत्रसंचालन कॉ. सुनील सांगळे यांनी प्रभावीपणे पार पाडले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ADEE सुनील गढवाल आणि मंडळ कोषाध्यक्ष कॉ. ए. डी. निकम उपस्थित होते. त्यांचे यथोचित स्वागत कमिटी सदस्य शशिकांत अहिरे, महिंद्र शिंदे, दीपक कुमार आणि वरिष्ठ कार्यकर्ते कॉ. चंद्रशेखर खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उपस्थित मान्यवरांमध्ये कॉ. विजय शेळके, कॉ. दत्तात्रय शिंदे, कॉ. चंद्रशेखर खैरे, कॉ. भारती कुशवाह, कॉ. हाश्मी साहेब, हर्षल घाटे साहेब, पवार साहेब यांचा समावेश होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप सोनवणे, सुरेश पगारे, सुनील ताडगे, राहुल झाल्टे, दीपक झाल्टे, गोरख झाल्टे, नवनाथ हिंगे, राहुल केदारे, जनार्धन घाडगे, सुखदेव धात्रक, रणजित कुडवे, भास्कर घुगे, आनंद उगलमुगले, गणेश मराठे, किरण बिडगर, वर्षा वायदंडे, लता भोसले, अंजनाबाई कदम, अजिनाथ चव्हाण, दिनेश सोनवणे, श्रावण भांगरे, संजय कोळेकर, अभिरंजन कुमार, रशीद शेख, वाल्मिक भडके, रवींद्र बोराडे, ए ए बोरसे, राकेश शिंदे, जलसिंग मीना, पवन मुंजाळ, उदय कुमार, गौरव कुमार आदींचा उल्लेखनीय सहभाग होता.कार्यक्रमात कॉ. दीपक कुमार, उमेश खैरनार, सोनाली आहेर, हर्षल घाटे साहेब, दयानंद राजनोर साहेब, कॉ. भारती कुशवाह, कॉ. हाश्मी साहेब यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर मनोगत व्यक्त करत सामाजिक समतेचा संदेश दिला.प्रमुख पाहुणे सुनील गढवाल साहेब (ADEE) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकार नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे महानायक होते. त्यांनी दिलेले मूल्य आजही प्रत्येक भारतीयासाठी दिशादर्शक ठरतात.”कॉ. ए. डी. निकम यांनी देखील युनियनच्या सामाजिक बांधिलकीवर भर देत बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी कॉ. चंद्रशेखर खैरे यांनी सर्व उपस्थितांचे, मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या युनियन कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.हा कार्यक्रम संविधानिक मूल्यांची जपणूक, सामाजिक सलोखा, आणि युनियन एकतेचे प्रतीक ठरला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, ओपन लाईन शाखा, मनमाड यांच्या एकजुटीने हा कार्यक्रम प्रेरणादायी व यशस्वी ठरला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, ओपन लाईन शाखा, मनमाड यांच्या एकजुटीने हा कार्यक्रम प्रेरणादायी व यशस्वी ठरला.
—————————— —————————— —-
नांदगावच्या उर्दु शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…!
नांदगाव:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नांदगाव येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 7 मध्ये उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शेख अयाज सर वसीम सर सुफियान सर आणि श्रीमती संगीता सोनवणे उपस्थित होत्या.डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाबद्दल चर्चा झाली. मुख्याध्यापक अयाज अहमद यांनी डॉ. आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशावर भर देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. श्रीमती संगीता सोनवणे यांनीही डॉ आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांचा आजच्या काळातही महत्त्व असल्याचे नमूद केले.हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला, आणि डॉ. आंबेडकर यांच्या आदर्शांचा प्रसार करण्यात यशस्वी झाला.
नांदगाव:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नांदगाव येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 7 मध्ये उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शेख अयाज सर वसीम सर सुफियान सर आणि श्रीमती संगीता सोनवणे उपस्थित होत्या.डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाबद्दल चर्चा झाली. मुख्याध्यापक अयाज अहमद यांनी डॉ. आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशावर भर देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. श्रीमती संगीता सोनवणे यांनीही डॉ आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांचा आजच्या काळातही महत्त्व असल्याचे नमूद केले.हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला, आणि डॉ. आंबेडकर यांच्या आदर्शांचा प्रसार करण्यात यशस्वी झाला.
—————————— —————————— —-
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन ताजोद्दीन यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
—————————— —————————— —-