मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न


मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे सौ. क्रांती मोरे न्यायाधीश दिवाणी न्यायालय मनमाड यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्री पुरुष समानता विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना स्वतःचे आकाश निर्माण करण्याची ताकद दिली. चूल आणि मूल या गर्तेत अडकवली गेलेली स्री पुरुषांच्या बरोबरीने आज प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. काळाच्या ओघात स्री बदलली तरी तिला सक्षमपणे उभी करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आणि कर्तुत्वाचा तिला विचार करावा लागेल. आजही रूढी परंपरेच्या जोखंडात अडकलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या सहाय्याने मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी स्त्रियांना जास्त प्रयत्न करावे लागतील. असे विचार याप्रसंगी त्यांनी मांडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी आपल्या व्याख्यानातून, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना विद्यार्थिनींनी आपण त्याचा अतिरिक्त वापर तर करत नाही ना? याची काळजी घेणे गरजेचे आहे. आजच्या या समाजात सकारात्मकतेने नवीन पाऊल टाकण्याची गरज निर्माण झाली आहे आणि असे केले तरच स्री स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकेल आणि टिकू शकेल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती अलकाताई शिंदे, डॉ. जे वांय इंगळे, वरिष्ठ विभाग पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्रा.सौ. कविता काखंडकी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आरती छाजेड व आभार प्रदर्शन प्राध्यापिका अलका नागरे यांनी केले. महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्यांचे कार्यक्रमासाठी मुलाचे मोलाचे सहकार्य लाभले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!