मनमाड पालिकेच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम…!


मनमाड पालिकेच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम…!

मनमाड(प्रतिनिधी):- देशभरात मतदानाचा घटलेला टक्का लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाने आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती मोहीम हाती घेतली असुन ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्वांना मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहे याचाच एक भाग म्हणून  मनमाड नगरपरिषद मनमाड व भारत  निवडणुक आयोग ,SVEEP अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम घेऊन एक गाणं मनमाडच्या मतदारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन एकात्मता चौक मनमाड येथे करण्यात आले.येथील ख्यातनाम गायक प्राध्यापक विनोद आहिरे व शशिकांत दाभाडे यांनी आपल्या पथकासह विविध गाणे गाऊन तसेच मतदान करण्यासाठी जनजागृती केली.
                 याच मोहिमेअंतर्गत नगर पालिकेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा सायकल रॅली मोटारसायकल रॅली सकाळी प्रभात फेरी याशिवाय अजूनही विविध उपक्रम राबविण्यात आले या मोहिमेत जवळपास मनमाड शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पालिकेच्या वतीने करण्यात आला असल्याचे मत मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन मनमाड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी  शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली  किरण आहेर, सभालिपीक,आनंद औटी,-वरीष्ठ लिपीक,प्रमोद सांगळे,किशोर आहिरे,किशोर व्यवहारे,जाॅनी जाॅर्ज,सुरेश राऊत,लक्ष्मण चव्हाण,बाळु गरुड,फत्तु शेख व ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य…!
आपल्या भारतात लोकशाही असुन प्रत्येक व्यक्तीला आपले सरकार किंवा आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय घटनेने प्रदान केला आहे मात्र नागरिक मतदान करण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा मतदान केल्याने काय फरक पडणार आहे असे बोलतात आशा नागरिकांना मतदानाचा हक्क बजावणे का महत्वाचे आहे हे समजून सांगुन मतदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते केलेच पाहिजे. या दृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे.
-शेषराव चौधरी, मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!