मनमाडला भाजपाकडून आचारसंहितेचा भंग…? तहसीलदार मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष…
मनमाडला भाजपाकडून आचारसंहितेचा भंग…? तहसीलदार मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष…
मनमाड(प्रतिनिधी):- १६ मार्च २४ रोजी दुपारी मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला व काल दुपारी साधारण चार वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू केली यानंतर तात्काळ राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तसेच सरकारी कार्यालयतील राजकिय नेत्याचे पक्षाचे नाव चिन्हे असलेली फलक झाकली मात्र मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अनेक सरकारी व खाजगी मालमत्तेवर भाजपच्या वतीने अबकी बार फिर मोदी सरकार असे रंगवले आहे व यासोबतच कमळ हे चिन्ह देखील काढण्यात आले आहे मात्र आचारसंहिता लागू होऊनही ते झाकले गेले नसल्याने आचारसंहिता भंग होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे सर्वाना वेगळा कायदा व भाजपला वेगळा कायदा का असेही जनतेकडून विचारले जात आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील प्रथम नागरिक म्हणून तहसीलदार व शहरातील प्रथम नागरिक म्हणून मुख्याधिकारी या दोघांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे.
२०१४ ची लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असुन यासाठी आदर्श आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे मुख्य निवडणूक आयोगाने निवडणूक आधीसुचना जाहीर करताना अनेक नियम वाचून दाखवले व या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले मात्र राज्यात व देशात सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदर्श आचारसंहिता भंग करण्यात येत आहे.मनमाड शहरातील शासकीय निमशासकीय तसेच खाजगी मालमत्तेवर अब की बार फिर मोदी सरकार असे पोस्टर रंगवण्यातआले आहेत मात्र अद्यापही हे पोस्टर झाकलेले नाहीत यामुळे आचारसंहिता भंग होत असुन याकडे तालुक्यातील तहसीलदार व शहरातील मुख्याधिकारी यांचे दोघांचेही दुर्लक्ष आहे आचारसंहिता भंग करणाऱ्यावर हे कारवाई करतील का ..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे मुळात इतराना वेगळा न्याय व भाजपला वेगळा न्याय असे शासकीय अधिकारी करतात का ? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.