मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत सेंट झेवीयर्स हायस्कूल प्रथम…


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत सेंट झेवीयर्स हायस्कूल प्रथम…
मनमाड(प्रतिनिधी):-राज्य सरकारने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियानात नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील सेंट झेवीयर्स हायस्कूलला प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले असुन लवकरच एका कार्यक्रमात सुमारे तीन लाख रुपये रोख बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.मनमाड येथील सेंट झेवीयर्स हायस्कूल ही नावाजलेली शाळा असुन या शाळेत अतिशय कडक नियम लागू आहेत याचाच भाग म्हणून शिस्तबद्ध असलेल्या वातावरणात मुले शिकतात आज त्याचे फळ मिळाले असल्याचे दिसते आहे.
             याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने  स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शाळांमध्ये आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यभर राबवले गेले होते. यामध्ये शाळांना विविध उपक्रम राबवावे लागणार होते यात लाखो रुपयांचे बक्षिसेही होती या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन 45 दिवसात करणे आवश्यक होते. विद्यार्थी केंद्रीत उपक्रम आयोजनासाठी 60 गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य ,आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखूमुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी 40 गुण असे एकूण 100 गुण देण्यात येणार होते .या घटकाची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे आवश्यक होते अभियानात सहभागी शाळांचे मूल्यांकन करून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक वरील शाळांना रोख रक्कम व पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार होते.सदर स्पर्धेत नांदगाव तालुक्यात सेंट झेवियर्स  हायस्कूल मनमाड या शाळेने  तालुकास्तरावर प्रथम क्रमांक  पटकविला आहे . सदर स्पर्धेसाठी शाळेतील प्रत्येक घटकांनी सहभाग नोंदवला.यासाठी  शाळेचे मुख्याध्यापक  फादर मॕल्कम नातो,पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्सना ,फा. लॉईड यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच  श्री.भावसार सर,गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोळे श्रीमती चंद्रमोरे मॕडम श्रीमती.ठोके मॕडम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सदर उपक्रमासाठी शाळेतील शिक्षिका सौ लिना जाधव मॕडम,.महेश भोसले सर व  अजिंक्य जाधव सर यांनी विशेष परिश्रम घेतले. इतर सर्व शिक्षकांनीही त्यांना सहकार्य केले. शाळेच्या या यशाबद्दल विविध स्तरावर पालक वर्गाकडून ,अधिकारी वर्गाकडून, माजी विद्यार्थी वर्गाकडून शाळेवर अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!