पांझन नदीकाठच्या लोकांना मनमाड नगर पालिकेच्या वतीने जाहिर आवाहन
पांझन नदीकाठच्या लोकांना मनमाड नगर पालिकेच्या वतीने जाहिर आवाहन
मनमाड(अजहर शेख ):- सध्या वागदर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने चांदवड तालुक्यात जर मोठ्या प्रमाणात रात्री पाऊस झाला तर पांझण नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. तरी मनमाड शहरातील पांझण नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या गवळीवाडा इदगाह, स्लीपर कॉलनी, मनोरम सदन लगतची झोपडपट्टी, टकार मोहल्ला झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.