फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे कुळवाडी भूषण पुरस्कारांची घोषणा
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे कुळवाडी भूषण पुरस्कारांची घोषणा
मनमाड( अजहर शेख ):- मनमाड शहरातील फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे सामाजिक शैक्षणिक औद्योगिक यासह कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना देण्यात येणारा येणारा कुळवाडी भूषण पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला असून यामध्ये सामाजिक कार्यामध्ये संगीता सोनवणे कामगार क्षेत्रात सतीश केदारे शैक्षणिक क्षेत्रात वसीम सय्यद सर तर औद्योगिक क्षेत्रात हाजी रफिक खान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंच कार्याध्यक्ष फिरोज शेख व सचिव विलास अहिरे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धी दिली आहे
कुळवाडी भूषण शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच या संघटनेतर्फे देण्यात येणारा कुळवाडी भूषण पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला असून सामाजिक शैक्षणिक कामगार व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो यंदा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नांदगाव येथील शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी मनमाड येथील ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशनचे सतीश केदारे यांचे नाव जाहीर करण्यात आला आहे यासह शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे वसीम सय्यद सर तर उद्योग क्षेत्रात आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारे स्टार पॅकर्सचे हाजी रफिक खान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता एकात्मता चौकात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या वेळी वरील मान्यवरांना सन्मान चिन्ह सन्मान सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन येथे सत्कार करण्यात येणार आहे या व्याख्यानासाठी उदगीर येथील संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्ह्याचे प्रवक्ते प्राध्यापक सिद्धेश्वर लांडगे सर यांना निमंत्रित करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मुस्लिम मावळे व सद्य परिस्थिती या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाला राजकीय शैक्षणिक कामगार क्रीडा यासह विविध क्षेत्रात काम करणारे नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती फुले आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोज शेख व सचिव विलास अहिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी दिली आहे