माध्यमिक विद्यालय सावरगाव येथे गुणगौरव सोहळा संपन्न.
माध्यमिक विद्यालय सावरगाव येथे गुणगौरव सोहळा संपन्न.
नांदगाव (महेश पेवाल):- ना शि प्र मंडळ नासिक संचलित माध्यमिक विदयालय सावरगाव येथे इयत्ता १०.वी सन २०२४-२५ उत्तीर्ण विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शशिकांत जाधव व प्रमुख अतिथी ह.भ. प. रामायणाचार्य माधुरीताई शेरेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ इशस्तवन व सरस्वतीपुजानाने झाला. कार्यक्रमाचे प्रस्तविक मा मुख्याध्यापक मिलिंद श्रीवास्तव यांनी केले. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शहरी भागातील विदयार्थ्यांनपेक्षा सवलतीचा अभाव असतांना, पालकांच्या शेती व्यवसायात मदत करून अभ्यासात प्रवीण्य मिळविल्याचे विषद केले व विदयार्थ्यांना भावी वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी गुणवंत विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विदयालयाच्या शिक्षिका श्रीमती हरणे यांनी आपले मनोगतातुन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. ह भ प माधुरीताई शेरेकर यांनी शालेय शिस्त व विदयार्थ्यांसाठी असलेले शिक्षकांचे योगदान ह्या विषयी दाखले देऊन मार्गदर्शन केले. डॉ शशिकांत जाधव यांनी व मुख्याध्यापक मिलिंद श्रीवास्तव यांनी गुणवंत विदयार्थ्यांना भावी शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांचा पुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत काकाळीज यांनी केले प्रभाकर सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ऋषिकेश डोमाडे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमा साठी विद्यार्थी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमा साठी सावन कासट व दगडू केदार यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.