नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन
नांदगाव ( महेश पेवाल ) : नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.यावेळी मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या सर्व सफाई कामगारांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारसीनुसार वारसांना लाभ मिळावा. अश्वासित प्रगती योजनेचा तातडीने लाभ मिळावा.सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी. पंचवीस टक्के संवर्गातील कर्मचाऱ्यांची विनाअट भरती करावी.
सफाई कर्मचाऱ्यांना घरकूल मिळावे. सेवानिवृत्तीचे लाभांसाठी शंभर टक्के अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. वरील मागण्यांचा प्रशासनाने त्वरित मान्य न केल्यास व कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी उपस्थितीची नांदगाव नगरपरिषद मुख्यअधिकारी शामकांत जाधव शैलस अहिरे रविंद्र भालेकर प्रकाश गुडेकर वाल्मीक गोसावी विकास गुडेकर विशल भालेकर अजय भालेकर संतोष भालेकर कपिल गायकवाड वैशाली पवार मालनबाई भालेकर बापू भालेकर हामित बाबू बॅग रंजीत अहिरे उपस्थित होते