राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्ताने नांदगावला रक्तदान शिबिर संपन्न..!
नांदगाव (महेश पेवाल/ अनिल धामणे):- राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्ताने ओसवाल श्वेतांबर जैन संघ, जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव, नांदगाव सहेली ग्रुप, स्थानक वासी जैन कॉन्फरन्स महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन ओसवाल भवन येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचा प्रारंभ जैन साध्वी मधुर व्याख्यानी पूज्य विचक्षणाजी महाराज व प्रसन्न मूर्ती पूज्य संकल्प दर्शनाजी यांच्या आशीर्वाचनाने झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने यांनी करून दिला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार चातुर्मास समिती अध्यक्ष आनंद चोपडा व संघ उपाध्यक्ष कमलेश पारख यांच्या हस्ते करण्यात आला नेत्रशल्य चिकित्सक डॉ.प्रमोद बोराडे व त्यांच्या टीमने नेत्र तपासणी केली तर चांडक पॅथॉलॉजी लॅबच्या टीमने मधुमेह तपासणी केली सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाइंट्स ग्रुपचे पदाधिकारी नरेंद्र पारख, जगन्नाथ साळुंखे, सुमित गुप्ता, बळवंत शिंदे, वामन पोतदार, सचिन खरोटे, रिषभ सुराणा, जायंटस् सहेली ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली दुसाने, भारती बोरसे, वंदना कवडे, पुष्पा दुसाने, वर्षा छाजेड, छाया परदेशी, ज्योती करवा, तारा शर्मा, अनुश्रीया जोशी, शंकूतला शिंदे आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकामाचे सूत्रसंचालन प्रसाद बुरकूल यांनी केले.