मनमाडला रात्रीपासून पावसाची संततधार ..पांझण व राम गुळणा नदीला मोसमातील पहिला पूर.नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
मनमाडला रात्रीपासून पावसाची संततधार ..पांझण व राम गुळणा नदीला मोसमातील पहिला पूर.नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
मनमाड(अजहर शेख) :- हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड ,चांदवड नांदगाव शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आल्याने मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण व राम गुळणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदी काठच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालिका प्रशासनाच्यावतीने रात्रीच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता सध्या परिस्थिती आवाक्यात असुन अजुन दोन दिवस पाऊस सांगितला आहे यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे याशिवाय पूराच्या पाण्यात कोणीही जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी केले आहे.