नांदगावला मुसळधार पावसामुळे लेंडी व शाकमबरी नदीला आला पूरशहरातील भोंगळे रोड महात्मा फुले चौक सुरज हॉटेल परिसरात घुसले पाणी
नांदगावला मुसळधार पावसामुळे लेंडी व शाकमबरी नदीला आला पूरशहरातील भोंगळे रोड महात्मा फुले चौक सुरज हॉटेल परिसरात घुसले पाणी
मनमाड(महेश पेवाल) :- हवामान खात्याने दिलेल्या यलो अलर्टमुळे नांदगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे शहरातील लेंडी व शाकमबरी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असुन शहरातील भोंगळे रोड महात्मा फुले चौक सुरज हॉटेल परिसरात पाणी घुसले आहे याआधी 2011 व 2021 साली नांदगाव शहरात पूर आला होता त्यावेळी शनी मंदिराजवळील पूल वाहून गेला होता तत्कालीन आमदार पंकज भुजबळ यांनी सहा महिन्यांत नवीन पुल तयार केला होता सध्या शहरात पाणी घुसले नसले तरी आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क असुन पालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी दिली आहे.