मनमाड मालेगाव महामार्गावर चोंडी घाटात आयशर कंटेनर अपघातात चालक क्लिनर गंभीर जखमी…!
मनमाड मालेगाव महामार्गावर चोंडी घाटात आयशर कंटेनर अपघातात चालक क्लिनर गंभीर जखमी…!
मनमाड(अजहर शेख):- मनमाड मालेगाव महामार्गावर चोंडी घाटात आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन यात दोन्ही गाड्याचे चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले असुन जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे त्याच्या डोक्यावर जबर मार लागला असुन त्याचा मेंदू बाहेर पडला आहे अशी प्राथमिक माहिती स्थानिक मदत करणाऱ्या कडुन समजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड मालेगाव महामार्गावर चोंडी घाट संपताच एक मोठा कंटेनर व आयशर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला अपघातात इतका भीषण झाला की यात दोन्ही ट्रक चालक व क्लिनर गँभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचतकार्य सुरू केले यात गंभीर जखमी झालेल्या चालक व क्लीनर यांना तात्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले आहे अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक नागरिकांनी वाहतुक कोंडी काढण्यासाठी मदत केली आहे.