शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर .


शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025
मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर .


मनमाड(अजहर शेख): भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या94व्या वर्षी निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष होते 32 वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे8 शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत, नांदगाव विधानसभेचे आमदार, 6 वर्ष विधांन परिषेद विरोधी पक्षनेते, मनमाड नगर पालिका चे थेट नगराध्यक्ष,भाकप महाराष्ट्र चे12 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अद्यक्ष पद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे.
कॉम्रेड माधवराव गायकवाड(बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक शेती, सहकार चळवळ, कामगार क्षेत्र आदी संदर्भात उपक्रम राबविले जातात. आज कॉम्रेड माधवराव गायकवाड 18 जुलै जन्मदिनी 2025ह्या वर्षी कॉम्रेड माधवराव गायकवाड 7 व्यां स्मृती दिनी जीवनगौरव पुरस्कारसाठी ज्येष्ठ कम्युनिस्ट साम्यवादी नेते, भाई माजी आमदार जयंत पाटील ( अलिबाग) निवड केली आहे. रोख रक्कम 51हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . सदर पुरस्कार वितरण नोव्हेंबर महिन्यात कर्मभूमीत अलिबाग येथे कॉ. माधवराव गायकवाड बाबूजी स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात येणारं आहे. या आधी हा पुरस्कार खा. राजू शेट्टी, कॉ. एम ए पाटील, कॉ . अण्णासाहेब थोरात,कॉ. मोहन शर्मा, कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. सूकुमार दामले , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ भालचंद्र कांगो यांना देण्यात आला आहे. अशी माहिती नाशिक येथे संस्थेच्या अध्यक्षा ॲड. कॉम्रेड साधना गायकवाड, सचिव कॉ. राजू देसले, यांनी दिली.विश्वस्त भास्कर शिंदे, , श्याम गरुड, व्ही डी धनवटे, सुभाष बेदमुथा, शबूशेट शिरसाठ, दत्तू तुपे, रिकब जैन, निखिल स्वर्गे, डॉ रामदास भोंग, देविदास भोपळे , साहेबराव गंभीरे होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष राज्यभर साजरे केले जात आहे. या निमीत्ताने जेष्ठ नेते कॉ.माधवराव गायकवाड त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शेतकरी चळवळ, सहकार, क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव ग्रंथ संपादित करण्यात येणार, विवीध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य चे पहिले विरोधी पक्षनेते विधान परिषद होते.
भाई जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे राज्य
सरचिटणीस वयाची 70 वर्ष पूर्ण होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष नेते भाई एन डी पाटील, जेष्ठ कमुनिस्ट नेते कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. ए बी बर्धन, कॉ. गोविंद पानसरे यांच्या सोबत काम केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष शतक महोत्सवी वर्षी , उच्च शिक्षण घेऊनही पूर्णवेळ चळवळी साठी आयुष्य वेचणारे नेते भाई जयंत पाटील यांचा गौरव करताना आनंद होत आहे.

Advertisement

भाई जयंत पाटील यांचा परिचय
भाई जयंत प्रभाकर पाटील

जन्म : ७ जुलै, १९५५
जन्म ठिकाण : भडवळ, तालुका-कर्जत, जिल्हा-रायगड
शिक्षण : एस.एस.सी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुप्रिया.
अपत्ये : एकूण-१ (मुलगा).
व्यवसाय : व्यापार.
पक्ष : शेतकरी कामगार पक्ष.
मतदारसंघ : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित.
इतर माहिती : सन २००० पासून अध्यक्ष, प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्था, अलिबाग, संचालक, कोकण एज्युकेशन सोसायटी, या संस्थेमार्फत अभियांत्रिकी महाविद्यालय, रोहा, आर्टस, कॉमर्स कॉलेज व महिला विद्यालय, पेझारी येथे सुरू केले; १९९१ संचालक, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन; १९९५ संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक लि., मुंबई, संचालक, मच्छिमार संघ; १९८६ संचालक व १९९६ पासून चेअरमन, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; राज्यात प्रथमच या बँकेला २००८-२००९ मध्ये “आय.एस.ओ”. नामांकन मिळवून दिले; ५ वर्षे संचालक, महाराष्ट्र राज्य मजूर संघ, पुणे; संस्थापक, रायगड बझार, या संस्थेमार्फत.
* 2018 शेतकरी संप,
सुकाणु समिती कर्जमुक्ती लढ्यात सर्व शेतकरी संघटना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शेतकरी कर्जमुक्ती त्यावेळी मिळाली. रायगड जिल्हा बँक मार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज शून्य दराने वाटप करतात. या बद्दल आनंद आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय

अलिबाग, पेण, खोपोली, पनवेल व जिल्ह्यात १० ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोअर्स सुरू केले; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०११-२०१२ महाराष्ट्र शासनाचा “सहकार निष्ठ पुरस्कार” व २०१२-२०१३ चा “सहकार भूषण” पुरस्कार प्राप्तः २० वर्षे चिटणीस, २००८ पासून सरचिटणीस रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष; शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाच्या बोर्डाचे सदस्य, युवक मेळाव्यांचे आयोजन; १९७४-७८ सदस्य, ग्रामपंचायत, पोयनाड; १९७९-९० सदस्य, पंचायत समिती; १९९७-२००० सदस्य, जिल्हापरिषद रायगड; २०००-२००६, २००६-२०१२, २०१२-२०१८ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषदः सन २००२ मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कार प्राप्त; सदस्य, लोकलेखा समिती, नियम समिती, सदस्य अनुपस्थिती समिती; जुलै २०१८ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर फेरनिवड.

परदेश प्रवास : स्वित्झरलँड, इंग्लंड, इटली, इस्त्राईल, दुबई व मलेशिया, चीन, न्युझीलंड, फ़्राँस् थायलंड, पोलंड व रशिया,अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, ग्रिस, स्पेन, पोर्तुगाल, इत्यादी देशात अभ्यास दौरा.

छंद : वाचन व प्रवास

पत्ता : (१) सुशिला सदन, मु. पेझारी-आंबेपूर, पो. पोयनाड, ता. अलिबाग, जिल्हा रायगड.
अश्या साम्यवादी विचाराचा वारसा पुढे नेणारे डाव्या परिवर्तनवादी चळवळ ना बळ देणारे भाई जयंत पाटील यांना पुरस्कार जाहिर करताना आनंद होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!