आशा भोसले यांचा 91 वा वाढदिवस साजरा..!
मनमाड(राजेंद्र धिंगाण):- मेलेडी क्विन सिने पार्श्वगायीका आशाजी भोसले यांच्या ९१ वाढदिवसानिमित्त मनमाडला सुरेली मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनेक गायक गायिकांचा सुरेली मैफिल मध्ये सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे आयोजक माही कराओके क्लब, स्वरसंबोधी ऑर्केस्ट्रा, पाकिजा कॉर्नर गुड मॉर्निंग व सागर सिनेमा आर्ट, मनमाड हे होते….तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुषमा तिवारी मॅडम व विजयकुमार गांगुर्डे सर यांनी भुषविले..या वेळी अक्रम शेख ,प्रियंका नडे,विलास अहिरे, नितीन जाधव
,सुनील मेंगनार ,योगेश शिरसाट ,फेरोज नरिमन ,संजय शिंदे ,राजू मिश्कि ,कृष्णा पांढरे ,शुभांगी भोसले ,भास्कर शिंदे ,रविकांत निरभवणे,दत्तु जाधव,देवेंद्र गवांदे, लाला मिर्झा, सुभाष धिंगाण,
सुनिता वानखडे,उषा दाभाडे,सुनील पगारे,भूषण गवळी,
आदींनी गित गायनातुन सुरेली मैफिलीत सहभाग नोंदविला..
या वेळी सलिमभाई शेख, ईकबाल भाई शेख, केशव आण्णा पाटील,मनिष केदारे याच्या हस्ते सहभागी कलाकारांना प्रमाणात व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.आयोजक माही कराओकेचे संचालक शशीकांत दाभाडे, स्वरसंबोधी ऑर्केस्ट्राचे संगीत विशारद प्रा.विनोद अहिरे व सागर सिनेमा आर्टचे निर्माता दिग्दर्शक लेखक डॉ. हिरामण मनोहर यांनी उपस्थितांचे आभार मानले
येत्या 27 तारखेला एस पी बालसुब्रमण्यम यांच्या पुण्यतिथी आणि लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गित गायन साठी कलाकारांना आव्हान विलास अहिरे यांनी केले…
शेवटी आशाजीच्या वाढवसा निमित्त केक कापण्यात आला…