नागापूरला जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण


मनमाड(राजेंद्र धिंगाण): आज नागापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने नागापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण लागवड करण्यात आले सदर वृक्षारोपण हे  गट विकास अधिकारी श्रीकिसन खातळे व नागापूर येथील लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण लागवड करताना त्यामध्ये वड पिंपळ लिंब चिंच इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली नागापूर येथील ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम व उमेश निकम , वानखेडे  सय्यद इत्यादी ग्रामपंचायत अधिकारी तसेच नागापूर उपसरपंच निलेश पवार व सदस्य तसेच शालेय शिक्षक वृंद व विद्यार्थी ,ग्रामस्थ, उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!