क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची मनमाड नगर पालिकेच्या वतीने जयंती साजरी…!


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची मनमाड नगर पालिकेच्या वतीने जयंती साजरी…!

Advertisement

मनमाड(राजेंद्र धिंगान):- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मनमाड नगरपरिषद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मनमाड नगरपरिषद मनमाड यांच्या संयुक्त विद्यामानाने केंद्र शासनाच्या हरघर संविधान अभियान अंतर्गत भारताचे संविधान या विषयावर संविधानाचे मुख्य व्याख्याते माननीय  तुषार बाबुराव पगारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र सदस्य तथा युवा सेना जिल्हाप्रमुख  फरान दादा खान, पोलीस उपअधीक्षक माननीय  बाजीराव महाजन साहेब, पोलीस निरीक्षक माननीय विजयकुमार करे साहेब, मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय शेषराव चौधरी, मनमाड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व आरपीआय नेते राजाभाऊ अहिरे, मनमाड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय राजाभाऊ पगारे, माजी नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील, शिवसेना नांदगाव तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष माननीय श्री साईनाथ भाऊ गिडगे, शिवसेना शहर प्रमुख श्री मयूर बोरसे, शिवसेना नगरसेवक सुनील भाऊ हांडगे, माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ शिरसाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य कैलास भाऊ भाबड, शिक्षण मंडळ माजी सभापती राजाभाऊ जाधव, यांचे सह नगरपरिषदेचे कर अधीक्षक कुठे तसेच उपमुख्य अधिकारी राजेंद्र पाटील, संविधान सहव्याख्याते सुनील लासुरे व इंगळे सर हे उपस्थित होते… यावेळी प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस हार अर्पण करून वंदन करण्यात आले…. तसेच मनमाड नगरपरिषद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी संविधान विषयावर सुनील लासुरे यांनी संविधानाची उपदेशिका / शप्पथ वाचन केले त्यांच्यासोबत सर्व प्रमुख पाहुणे मंडळी व श्रोते कर्मचारी अधिकारी विद्यार्थी यांनी देखील शपथ घेतली… तसेच सहव्याख्याते सुनील लासुरे यांनी तसेच मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक माननीय बाजीराव जी महाजन साहेब यांनी देखील संविधान सामाजिक दृष्ट्या कसे योग्य याबाबत व्याख्यान देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत आनंदात व शांततेत साजरी करण्याबाबत आव्हान केले… तदनंतर महाराष्ट्राचे संविधान मुख्य व्याख्याते, महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेले तुषार बाबुराव पगारे सर यांनी भारताचे संविधान सामाजिक दृष्ट्या कसे योग्य… असहिष्णुता सामाजिक बांधिलकी एकात्मता,, तसेच समता बंधुता असे अनेक विषय घेऊन भारताचे संविधान संदर्भात अत्यंत उत्कृष्ट व्याख्यान देऊन उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन झाले… सदर व्याख्यान ऐकण्यासाठी मनमाड शहरातील नागरिकांसह मनमाड नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी तसेच मनमाड शहरातील विविध शाळांचे शिक्षक विद्यार्थी, मनमाड शहरातील विविध शासकीय विभागातील कर्मचारी वृंद उपस्थित होते…. मनमाड नगरपरिषद तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व पाहुणे मंडळीचे तसेच मुख्य वाक्य ते श्री पगारे सर तसेच सहव्याख्याते व उपस्थित सर्व श्रोते मंडळींचे आभार मानून राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे सभा लिपिक  किरण आहेर यांनी केले.. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे मनोज मगर, निलेश सपकाळे, विलास होकिरे, किशोर अहिरे जॉनी जॉनी, कैलास पाटील, रवी थोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवी खलसे, सागर अहिरे, अशोक कटारे, सुनील दराडे सतीश कांबळे, तुषार बोराडे, भारत वाघ, इनायत मोमीन, प्रदीप धिंगाणव अन्य कर्मचारी बांधवांनी प्रयत्न केले….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!