मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे यांची यावर्षीही स्वीझरलँड दौऱ्यासाठी निवड…..


मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे यांची यावर्षीही स्वीझरलँड दौऱ्यासाठी निवड….

मनमाड (आवेश कुरेशी): दावोस स्विझरलँड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आन्युअल मिटिंगसाठी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या सोबत जाणारे एकमेव अधिकारी म्हणुन प्रा.श्री नितीनजी लालसरे यांची निवड करण्यात आली आहे , मागील वर्षी देखील प्रा. लालसरे यांची या दौऱ्यासाठी निवड झाली होती.

Advertisement

दिनांक 16 ते 20 जानेवारी दरम्यान दावोस स्विझरलँड येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आन्युअल मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे , मागील वर्षी या मिटिंगमध्ये महाराष्ट्रात 1 लाख 37 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक करण्यात आली होती , यावर्षी देखील जवळपास 2 लाख कोटींची विदेशी गुंतवणूकीचे टार्गेट महाराष्ट्र शासनाचे असुन तसे प्रयत्न करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी देखील या मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे जाणार आहे . या मिटिंगमध्ये संपुर्ण जगातील नामवंत आणि मोठे उद्योजक सहभागी होणार असुन , या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या दौऱ्यासाठी यंदाच्या वर्षी देखील त्यांच्या सोबत जाणारे एकमेव आणि विश्वासु अधिकारी म्हणुन मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितिन लालसरे यांची निवड मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयातून करण्यात आली आहे.प्रा.नितिन लालसरे यांना या दौऱ्यासाठी अनेकांकडुन शुभेच्छा देण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!