मनमाडला रेल्वे ओव्हरब्रिज वरून पडून अज्ञात इसमाचा मृत्यू त्याचा पेहराव व अवतार बघून भिकारी असल्याचा अंदाज
मनमाडला रेल्वे ओव्हरब्रिज वरून पडून अज्ञात इसमाचा मृत्यू त्याचा पेहराव व अवतार बघून भिकारी असल्याचा अंदाज
मनमाड(अजहर शेख) :- मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज वरून पडून एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असुन त्याचा पेहराव व अवतार बघून कोणीतरी मागणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे मयत तरुण याला फिट येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले तर फिट किंवा चक्कर आल्यानंतर तो पुलावरून पुलाचे काम चालू असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडला व यातच त्याचा मृत्यु झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.