मनमाड वकील संघाच्या वतीने गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध..!


मनमाड वकील संघाच्या वतीने गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध..!

मनमाड(अजहर शेख):-  मनमाड वकील संघाच्या वतीने भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  भूषण गवई  यांच्यावर माथे फिरू व जातीवादी एडवोकेट राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा जो भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मनमाड वकील संघाचे वतीने अध्यक्ष एडवोकेट किशोर सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली बैठक होऊन वकील संघाच्या वतीने या तीव्र घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. हा न्यायाधीशावर हल्ला नसून हा न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वकील संघाचे माजी अध्यक्ष एडवोकेट सुधाकर मोरे सेक्रेटरी एडवोकेट शशिकांत व्यवहारे यांनी  व्यक्त केल्या तसेच सदरील माथेफिरू एडवोकेट राकेश किशोर याची सनद बार कौन्सिल ऑफ इंडियाने कायमस्वरूपी रद्द केली असल्याने त्यास भारतामधील कोणत्याही न्यायालयात प्रॅक्टिस करण्यास मनाई केलेली आहे. या अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी आज मनमाड न्यायालयाने या घटनेचा तीव्र निषेध करून मनमाड न्यायालयामध्ये आज वकील संघाने यांनी स्वतःहून आज  कामकाज भाग न घेता निषेध नोंदवून अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे व सदरील वकिलावर योग्य ती कायदेशीर कारवाई कोर्टाचा अवमान केल्या बाबत करावी असा ठराव करण्यात आला. सदर मीटिंगमध्ये ऍडव्होकेट दिलीप दिसले एडवोकेट रमेश अग्रवाल एडवोकेट उल्हास गवांदे एडवोकेट राजेंद्र पांडे योगेश बनकर एडवोकेट एडवोकेट सुरज उबाळे एडवोकेट सुमित दंडगव्हाळ राजेंद्र पालवेनासिर पठाण एडवोकेट मोहसीन शिकलगार एडवोकेट प्रदीप संसारे एडवोकेट योगेश मिसर एडवोकेट खुशलरावकुंभारे एडवोकेट अमित सोनवणे एडवोकेट सुरेश मल्हारे एडवोकेट राजेंद्र अहिरे इत्यादी वकील उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!