नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना सरकारने संपूर्ण कर्ज माफी देऊन प्रती एकर रु पन्नास हजार रुपये मदत द्यावी – प्रवीण पगारे


नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना सरकारने संपूर्ण कर्ज माफी देऊन प्रती एकर रु पन्नास हजार रुपये मदत द्यावी – प्रवीण पगारे
मनमाड(आवेश कुरेशी)  :- चालू वर्षी एकसारख्या नैसर्गिक पावसाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. पिकां बरोबर माती पण वाहून गेलेली आहे. शेतकरी पूर्ण पने उद्वस्त झालेला आहे. त्यामुळे तो कर्जाच्या ओझ्यामुळे आपले जीवन संपवीत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशीच ऐका शेतकरी दाम्पत्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. पत्नीने विहिरीत उडी घेतली तर तिच्यावर अंत्यसंस्कार उरकून परतल्यानंतर त्याच विहिरीजवळ पतीने गळफास घेतला. कर्जबाजारीपणामुळे दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतला.  छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 43 वर्षीय शेतकरी विलास रामभाऊ जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर 43 गुंठे जमीन होती. शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने  पत्नी रमाबाई यांच्यासमवेत मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी तसेच खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावरही बचत गटाचे कर्ज होते. कर्ज फेडायचे कसे या चिंतेत रमाबाई यांनी शुक्रवारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुले आणि नातेवाईक घरी गेले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या शेतात जाऊन  कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची पोस्ट केली आणि रमाबाई यांनी आत्महत्या केलेल्या विहिरीजवळील झाडाला गळफास घेतला. गावकऱ्यांना हे समजताच गावकऱ्यांनी जमधडे यांच्या शेताकडे धाव घेतली. तिथे झाडाला लटकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. तेव्हा आता सरकारने या घटने मधून जागे होऊन राज्यातील शेतकऱ्यांना विश्वास दिला पाहिजे. की, शेतकऱ्यांनी त्यांच्या कडील कोणत्याही बँकेच्या कर्जाची काळजी करू नये. त्या कर्जाचे काय करायचे ते सरकार पाहून घेईल. आणि त्याच प्रमाणे नुकत्याच पंजाब सरकारने शेतकऱ्यांना जी प्रती एकर रु पन्नास हजार रुपये भरपाई दिली त्याप्रमाणे आम्ही पण तुम्हाला नुकसान भरपाई देऊ. असे निसंदिग्ध आश्वासन सरकाने शेतकऱ्याला द्यावे. तरच बळी राज्याच्या आत्महत्या थांबतील. अन्यथा या अतिवृष्टी मुळे हवालदिल झालेले शेतकरी वरील दाम्पत्या प्रमाणे मार्ग निवडतील. तेव्हा सरकारने आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या नंतर त्यांच्या कुटुंबाला चेक देण्या ऐवजी आत्महत्या करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. सरकारने नुसते आम्ही तुमच्या पाठीशी आहो, असे म्हण्यात काहीही अर्थ नाही तर प्रत्यक्ष कृतीतून ते दिसले पाहिजे. असे एका पत्रकान्वये मनमाड येथील बहुजन समाज पक्षाचे नांदगाव विधान सभा अध्यक्ष प्रवीण पगारे आणि सामाजिक कार्यकर्ते एस.एम.भाले यांनी सरकारला आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!