स्वच्छताही सेवा पंधरवडा निमित्ताने पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न
मनमाड ( राजेंद्र धिंगाण ):- मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी व आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या आधिपत्याखाली आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छेत्सव स्वच्छता हि सेवा २०२५ अंतर्गत शहराच्या मनमाड नगर परिषदेच्या आरोग्य विभागासह विविध विभागाचे वतिने प्रभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे यावेळी उपमुख्याधिकारी पुष्पक निकम विलास हुकीरे आरोग्य निरीक्षक वैभव भामरे शहर समनव्यक डॉ अर्चना बागुल मानसी जाधव अमित चोपडे अनिल गवळी विलास कातकडे तुषार पाटील किशोर आहिरे सतिश चावरीया राजेंद्र धिंगाण संजय बहोत मटरुलाल चुनियान आनंद छाजेड संतोष वानखेडे शिवाजी बोडके निखील करोसीया शाम खलसे संतोष चव्हाण विजय घुगे मोठया संख्येने आरोग्य विभागाचे माहीला आणि पुरुष कर्मचारी सामील होते स्वच्छता हि सेवा अंतर्गत महात्मा गांधी एकात्माचौक ते रेल्वे स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्माफुले चौक तसेच डेली मार्केड व शहराच्या विविध ठिकठिकाणी रहदारी मुख्यरस्ते व इतर अनेक ठिकाणी जनजागृती करण्यात आली