मुसळधार पावसाने रेल्वे इन्स्टिट्यूट झाले जलमय…! करोड रुपये निधी खर्च…?
मुसळधार पावसाने रेल्वे इन्स्टिट्यूट झाले जलमय…! करोड रुपये निधी खर्च…?

मनमाड(अजहर शेख):- शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (रेल्वे इन्स्टिट्यूट) हे संपूर्ण जलमूय झाले होते या मैदानाला अक्षरशः जलाशयाचे स्वरुप आले होते मुळात या इन्स्टिट्यूटसाठी व मैदानासाठी जवळपास एक करोड रुपये निधी आला असुन यातील काही निधी खर्च करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जर एवढे पैसे खर्च करण्यात आले तर मग पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नाही का..?असा सवाल रेल्वे कर्मचारी वर्गातर्फे विचारण्यात येत आहे.या मैदानाला ऐतिहासिक महत्व असुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 व 13 फेब्रुवारी 1938 साली भव्य कामगार महिला व युवक परिषद घेतली होती त्यामुळे या मैदानाला डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण असे नामकरण करण्यात आले आहे मात्र आंबेडकर यांचे नाव असलेल्या मैदानाची झालेली दुरवस्था बगवत नसल्याने आंबेडकरी जनतेने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.भविष्यात या मैदानात अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी रेल्वे कर्मचारी व आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे.
