मनमाडला बारामती पाचोरा बसला अपघात सुदैवाने जीवितहानी टळली…!
मनमाडला बारामती पाचोरा बसला अपघात सुदैवाने जीवितहानी टळली…!
मनमाड(आवेश कुरेशी):- मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे शिवारात बारामती पाचोरा बसला अपघात झाला ओव्हरटेक करतांना ही बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरली मात्र सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही स्थानिक रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले व आपत्कालीन दरवाजातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले व सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासाला रवाना करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बारामती वरून पाचोरा जाणारी बस क्रमांक एम एच 14 एम एच 8593 ही बस मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे शिवारात जात असताना ओव्हरटेक करत असतानाच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व यात ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात उतरली यामुळे बसमध्ये सर्व प्रवाशी अडकले अपघात गावाच्या समोर घडला यामुळे स्थानिक गांवकरी भीमा शिंदे व इतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व या बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना इमर्जन्सी एक्सिट (आपत्कालीन दरवाजातून) बाहेर काढले व सर्वांना सुखरूप दुसऱ्या बसमध्ये बसवुन पुढील प्रवासाला रवाना केले.या अपघातात सुदैवाने कोणीतीही जिवीतहानी झाली नाही
इंदुर पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे…!
मनमाड शहरांतून जाणारा इंदुर पुणे हा महामार्ग आहे हा रस्ता एमएमकेआयपीएल कडे आहे या रस्त्याची देखभाल या टोल कंपनीकडे आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असुन या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत याशिवाय या महामार्गावर अनेक ठिकाणी साईडपट्ट्या नाहीत त्यामुळे देखील अनेक अपघात झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीने या महामार्गावर असलेले खड्डे बुजवून साईड पट्ट्या दुरुस्ती कराव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे.