मनमाड कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन संपन्न.
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन संपन्न.
मनमाड(आवेश कुरेशी):- येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या हस्ते विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवीन तंत्रज्ञान वापराबद्दल विशेष माहिती दिली. नॅनो टेक्नॉलॉजी तसेच ए .आय टेक्नॉलॉजी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कशी वापरतो व त्या टेक्नॉलॉजी मुळे आपले विज्ञान कसे प्रगत होते आहे याबद्दल विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडले तरच त्यातून विज्ञान जन्म घेते हे वैज्ञानिक कारणांचा दाखला देत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रवृत्ती शोधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. एस.डी. देसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. आर.फंड, शैक्षणिक पर्यवेक्षक डी.आर. कातकडे, विज्ञान विभाग प्रमुख आय. एम.खान, रसायनशास्त्र विभागाच्या श्रीमती अनुपमा पाटील, वाणिज्य मंडळ प्रमुख एस.आर.पानपाटील, कला विभाग प्रमुख ए. आर.देसले , विज्ञान मंडळाचे सर्व सदस्य व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता शिंदे तर आभार प्रा. सविता पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.