डॉक्टर्स डे निमित्ताने मनमाड मधील डॉक्टरांचा सन्मान
मनमाड(प्रतिनिधी):- डॉक्टर्स डे निमित्ताने मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने मनमाड मधील सुप्रसिद्ध डॉक्टर स्व.डॉ.मालते सर यांचे स्मृतीने या वर्षी डॉक्टर्स डे निमित्त आपण किमान 25 वर्षे practice पूर्ण करणाऱ्या सर्व सन्मानीय ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान पल्लवी मंगल कार्यालय येथे श्रीमती मालते व डी वाय एस पी श्री बाजीरावजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रवीण शिंगी,डॉक्टर सुनील बागरेचा, डॉक्टर अजय जी भन्साळी यांची विशेष उपस्थिती होती. ऍलोपॅथी मधील डॉक्टर नूतन पहाडे व इतर मान्यवर डॉक्टर आणि डेंटल मधील डॉक्टर प्रकाश मेने आयुर्वेद मधील डॉक्टर प्रताप गुजराती व इतर मान्यवर डॉक्टर तसेच होमिओपॅथी मधील डॉक्टर बहादुरे व इतर मान्यवर डॉक्टर ज्यांची 25 वर्षे होऊन अधिक सेवा झालेली आहे अशा तब्बल 40 डॉक्टरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.कार्यक्रमाला मनमाड शहरातील 100 हून अधिक डॉक्टर यावेळी पूर्णवेळ उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास जाधव व डॉक्टर रोहिणी हारदे यांनी केले तथा आभार प्रदर्शन डॉक्टर स्वाती कातकडे यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर गौरव पाटील डॉक्टर विलास झाल्टे व डॉक्टर नितीन जैन यांनी विशेष योगदान दिले.