मुख्याधिकारी व त्यांच्या दलालाकडून माझ्या जीवाला धोका ; सिटूचे रामदास पगारे व रमेश बोरसे यांची पोलीस ठाण्यात तक्रार…
मुख्याधिकारी व त्यांच्या दलालाकडून माझ्या जीवाला धोका ; सिटूचे रामदास पगारे व रमेश बोरसे यांची पोलीस ठाण्यात तक्रार…
मनमाड(अजहर शेख):- मनमाड नगर पालिकेच्या डेली बाजार कलेक्शन करणाऱ्या पालिकेचा कर्मचारी रमेश बोरसे याला मुख्याधिकारी शेषराव चौधरी व त्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्यांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सिटूच्या उत्तर महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी रामदास पगारे व रमेश बोरसे यांची बदली करून उलट त्यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले म्हणून मनमाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असुन पोलिस निरीक्षक यांनीही अर्ज घेण्यासाठी नकार दिल्याने त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती पगारे व बोरसे यांनी दिली आहे.आमची 113 किलोमीटर बदली करून आमचा घातपात होण्याची शक्यता देखील त्यांनी अर्जात नमूद केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून शेषराव चौधरी हे कामकाज बघत आहेत मात्र चौधरी हे पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अनेक नियमबाह्य काम करत आहेत यातच त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी करून इतर संघटनेचे सदस्य होण्यासाठी सांगण्यात येत असतानाच या सर्व कामाला विरोध केला म्हणून रमेश बोरसे यांना मुख्याधिकारी चौधरी व त्यांच्या चेले चपाटे यांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून जातीवाचक व अशील भाषेत शिवीगाळ केली याबाबत त्यांनी रीतसर सिटू संघटनेचे कॉ रामदास पगारे यांच्याकडे लेखी तक्रार केली याचा जाब विचारण्यासाठी पगारे यांनी मुख्याधिकारी यांना रीतसर पत्र दिले मात्र याचा राग आल्याने मुख्याधिकारी यांनी पगारे व बोरसे यांची नियमबाह्य करंजवन पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी बदली केली जवळपास 113 किलोमीटरवर बदली करून आमचा घातपात घडवून आणण्यासाठी हीबदली केली असल्याची लेखी तक्रार अर्ज बोरसे यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात दिले मात्र ते पत्र न घेता उलट यांनाच समजपत्र देण्यात आले त्यामुळे बोरसे यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक बाजीराव महाजन यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला असुन मुख्याधिकारी चौधरी व त्यांच्या जवळच्या चेले चपट्या कडुन आमच्या जीवाला धोका आहे असे म्हटले आहे याबद्दल पोलीस देखील काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप बोरसे यांनी केला आहे.मुळात मनमाड नगर पालिका ही भ्रष्टाचाराने बरबटली असुन चुकीच्या कामाचे समर्थन करा अन्यथा बदल्या किंवा निलंबित करू आशा धमक्या खुलेआम। देण्यात येत आहेत मात्र याला स्वतः मुख्याधिकारी देखील पाठिशी घालत असल्याचा आरोप बोरसे यांनी केला आहे.
मला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करेल…!मी मला दिलेले काम मी एकदम प्रामाणिक करत आहे माझ्या सेवानिवृत्तीला अवघे काही महिने बाकी आहेत माझी तबेत खराब असताना देखील मी मला दिलेले काम वेळेत आणि प्रामाणिकपणे करतो मात्र मुख्याधिकारी व त्यांच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी मला दमदाटी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली याबाबत मी सिटू युनियन कडे लेखी तक्रार केली मात्र त्यांनी माझी व आमचे नेते रामदास पगारे यांची हेतुपुरस्सर व नियमबाह्य बदली केली आहे.मुळात मी पोलीस ठाण्यात न्याय मागितला आहे मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेलरमेश बोरसे, वसुली कर्मचारीभ्रष्टाचाराचे साथीदार व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा..मनमाड नगर पालिकेच्या सेवानिवृत्त घेलेलेल्या सफाई कामगारांना त्यांच्या जागी त्यांच्या वारसांना कामाला लावून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहे याशिवाय जनरल फंडातून ठेकेदाराचे टक्केवारी घेऊन बिल काढण्यात येत आहेत याशिवाय अजून अनेक भ्रष्टाचाराचे काम पालिकेत सुरू असुन या कामात अडथळा आणतो म्हणुन आधी ऑफर दिली ती मान्य न केल्याने सरळ बदली करण्यात आली आहे पालिकेत मुळात भ्रष्टाचाराचे साथीदार व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे धोरण सुरू असुन मी याबाबत जिल्हाधिकारी आयुक्त व मंत्रालयात तक्रार केली आहे व येत्या 26 मेला मुंबई आझाद मैदानात उपोषण करणार आहे न्याय मिळेल ही आशा आहे.कॉ रामदास पगारे जनरल सेक्रेटरी सिटू युनियन.