मनमाडला उभ्या गाडीतून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद
मनमाडला उभ्या गाडीतून डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद

याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहर परिसरात पेट्रोल डिझेल केरोसीनच्या इंधन कंपन्या आहेत हे इंधन कंपन्या म्हणून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो यासाठी येणाऱ्या टँकर तसेच भारतीय खाद्य निगम मधील धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक कंपनी बाहेर तसेच हॉटेल ढाबा पेट्रोल पंप या ठिकाणी उभे असतात या उभ्या असणाऱ्या वाहनांमधून स्विफ्ट डिझायर ईरटीका यासारख्या वाहनातून टिल्लू मोटर लावून डिझेल चोरी करण्याचा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता यामुळे येथील टँकर मालक वाहन चालक वैतागून गेले होते नुकत्याच पंधरा दिवसांपूर्वी जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचा डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली होती यानंतर या वाहन मालक चालकांनी स्वतःच रात्रीच्या वेळी जास्त घालण्यास सुरुवात केली व काल रात्री मालेगाव रोडवरील ललवानी यांच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर डिझेल चोरी करण्यासाठी स्विफ्ट डिझायर मधून काही लोक आले चालक व मालकांना त्यांचा संशय आल्यानंतर त्यांनी गाडीचा पाठलाग केला चोरट्यांनी गाडी सरळ मालेगावच्या दिशेने सुसाट वेगाने नेली मात्र यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी तात्काळ त्यांची मेडिकल करून पुढील कारवाई सुरू केली सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकलला आणल्यानंतर वाहन मालकांनी यातील काही आरोपींना मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला यामुळे मोठा अनर्थ टळला पुढील तपास पोलीस करत आहे.







