मनमाडला चोरट्याकडुन 25 मोटारसायकल हस्तगत मनमाड पोलिसांची कारवाई…!
मनमाडला चोरट्याकडुन 25 मोटारसायकल हस्तगत मनमाड पोलिसांची कारवाई…!
मनंमाड(अजहर शेख):- गेल्या अनेक दिवसांपासून मनमाड शहर व परिसरातील अनेक मोटारसायकल चोरीला जात होत्या यावर गांभीर्याने लक्ष देऊन मनमाड पोलिसांनी हिस्ट्री शिटर असलेल्या रेकोर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवली यावरून दोन आरोपींना रंगेहात अटक करून 3 दिवस पोलिस कस्टडी घेऊन त्यांच्याकडून तब्बल 25 मोटारसायकल हस्तगत केल्या त्यांनी या सर्व मोटारसायकल मनमाड नांदगाव येवला या परिसरातुन चोरल्याची कबुली दिली आहे.पुढील तपास सुरू असुन अजुन आरोपी आणि अजुन गाड्या मिळण्याची शक्यता पोलिस निरीक्षक विजय करे यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या मोटारसायकलवर नजर ठेवून येथून या गाड्या चोरुन थेट गॅरेजवर नेऊन वेगवेगळ्या मोटारसायकल मध्ये पार्ट बदलुन या गाड्या ग्रामिण भागातील खासकरून आदिवासी भागात विकण्याचा सपाटा या चोरट्यांनी लावला होता याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर मनमाड शहर पोलिस निरीक्षक विजय करे यांनी गोपनीय शाखा व एलसीबी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वात आधी हिस्ट्री शिटर असलेले रेकॉर्डवरील आरोपी यांच्यावर पाळत ठेवा आणि तेच झाले मनमाड शहरातील आकाश सुभाष राऊत राहणार गणेश नगर व शुभम विशालदीप झालटे राहणार मुरलीधर नगर मनमाड
यांना गाडी चोरताना रंगेहाथ अटक करण्यात आली त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलिस कस्टडी दिली यात पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास 25 गाड्या हस्तगत केल्या यात
जायखेडा येथून 10 नामपुर येथून 3 मालेगाव।येथून 4 कोपरगाव येथून 3 बाकी सर्व गाड्या मनमाड येथून हस्तगत केल्या या सर्व गाड्या मनमाड नांदगाव येवला या भागातील असल्याचे त्यांनी सांगितले असुन आम्ही गाडी चोरल्यानंतर गॅरेजवर घेऊन जातो तेथे गाड्याचे पार्ट आदलाबदल करून ग्रामीण आणि दुर्गम भागात या गाड्या विकून टाकतो अशी कबुली दिली आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करून याबाबत अजून तपास करून आणखीन आरोपी व मोटारसायकल मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.या कारवाईत संदीप झालटे,गौरव गांगुर्डे, रंजित चव्हाण,राजू खैरनार ,नितीन मैद हे सहभागी झाले होते.
