मनमाडला वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी इंदूर पुणे महामार्गावर झाड कोसळले वाहतूक ठप्प..
मनमाड((अजहर शेख):- गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असुन मनमाडला देखील पावसाची रोज हजेरी आहे आजदेखील वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली वादळामुळे इंदूर पुणे महामार्गावर बस स्थानकासमोर झाड कोसळले यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मात्र इंदूर पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली पावसामुळे महावितरणची मुख्य वायर तुटून पडली सुदैवाने याचादेखील कोणाला त्रास झाला नाही स्थानिक नागरिकांनी सतर्कता बाळगून तात्काळ महावितरण कार्यलयात फोन केला यामुळे त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला त्यामुळे जीवितहानी झाली नाही.