मनमाड पालिकेचे सफाई कर्मचारी काम करण्यासाठी करतात टाळाटाळ ; व्यवसायिकांची तक्रार
मनमाड पालिकेचे सफाई कर्मचारी काम करण्यासाठी करतात टाळाटाळ ; व्यवसायिकांची तक्रार
मनमाड(अजहर शेख):- मनमाड नगर पालिकेच्या रोज नवीन नवीन घटना ऐकायला मिळतात कधी अधिकारी मनमानी करतात तर कधी स्वच्छता कर्मचारी मनमानी करतात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या मनमाड नगर पालिकेच्या मालकीच्या व्यवसायिक संकुलासमोर सफाई कर्मचारी हे सफाई करण्यासाठी येतच नसल्याची तक्रार येथील व्यवसायिकांनी केली असुन पालिकेला आम्ही सर्व कर भरतो मग आमच्यासोबत दुजाभाव का याबाबत आम्ही एक दोन वेळा तोंडी तक्रारी देखील केल्या मात्र पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही यामुळे आम्ही आता कोणाकडे न्याय मागावा असा सवाल या व्यवसायिकाडुन विचारला जात आहे.