भारत पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईन मधून इंधन चोरी…?
मनमाड(आवेश कुरेशी ):- मनमाड येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई ते मनमाड या पाईपलाईनला थेट टॅप करून नळ कनेक्शन करतो त्याप्रमाणे थेट पाईपलाईन द्वारे दूरपर्यंत कनेक्शन करण्यात येऊन तब्बल 48 फूट पेक्षा जास्त पाईपलाईन लावून नळ कनेक्शन जोडतो त्याप्रमाणे जोडून त्या पाईपलाईन मधून हजारो लिटर डिझेलची चोरी करण्यात येत होती याचा उलगडा झाला खरा मात्र हे सर्व कोणी केले याबाबत अद्यापही काही समजले नाही आज दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर ही पाईपलाईन खोदून रिपेयर करण्याचे काम सुरू होते आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत काम सुरू होते मात्र या सर्व प्रकारामुळे भारत पेट्रोलियमसह सर्व कंपनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन मुळात कंपनीच्या वतीने फायबर ऑप्टिकल सारख्या सुविधा वापरांचा दावा करण्यात येतो जेणेकरून कुठेही छोटेसे लिकेज असले तरी तात्काळ सिस्टीमला अलार्म वाजतो मग गेल्या अनेक महिन्यापासुन इथून होत असलेली इंधन चोरी लक्षात आली नाही का..? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी मनमाड शहरात इंधन माफीयांची मोठी टोळी सक्रिय होती यात गल्लीतील नेत्या पासून ते दिल्लीतील नेत्यापर्यंतचा मोठे रॅकेट कार्यरत होते या सर्व प्रकारात तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची जाळून हत्या करण्यात आली यानंतर मनमाड शहर हे इंधन माफिया शहर म्हणून नावारूपाला आले होते मात्र काही काळ हा प्रकार थांबल्यानंतर मनमाड शहरातील आजूबाजूच्या परिसरात पुन्हा छोट्या मोठ्या इंधन चोरांनी आपले बस्तान बसवली होती यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या टीम मार्फत अनेकदा कारवाई देखील करण्यात आले आहे मात्र ही इंधन चोरी ही अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली असून आज दुसऱ्या दिवशी नळ कनेक्शन काढून कंपनीच्या पाईपलाईनला पुन्हा जॉइन करण्याचे काम सुरू होते आजच्या दिवसाची परिस्थिती बघून हा सर्व प्रकार अनेक वर्षापासून सुरू असल्याचे प्राथमिक रूपात दिसत आहे मात्र इंधन कंपन्यांकडून सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी हलगर्जीपणा झाल्याचे देखील लक्षात येत आहे या पाईपलाईन वर प्रत्येक आठ किलोमीटर वर एक कर्मचारी देखरेखी साठी नेमण्यात आला आहे असे असताना देखील अशा प्रकारची चोरी होणे शक्य नाही याशिवाय कंपनीच्या आत मध्ये मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक अशा मशिनरी लावले आहेत याद्वारे देखील पाईपलाईन लिकेज लक्षात येते मात्र हा प्रकार का लक्षात आला नाही याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मनमाड शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावीमनमाड शहरातील भारत पेट्रोलियम तसेच इतर कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल केरोसीन उपलब्ध असते यापूर्वी अनेकदा इंधन भरून जाणारी टँकर मधून पेट्रोल डिझेल कडून त्याची विक्री करण्यात येत होती यावर कंपनीतर्फे अनेक नामे शक्कल लढवून या चोरीला आळा घालण्याचे काम केल चोरांनी तर आता थेट कंपनीच्या पाईपलाईन वरच डल्ला मारला असून जमिनीत पुरलेल्या या पाईपलाईनची परिस्थिती बघून ही पाईपलाईन किमान पाच सहा वर्ष किंवा त्याहीपेक्षा जुनी असल्याची चर्चा आहे पोलीस व कंपनी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व इंधन माफीया टोळीचा पर्दाफाश करावा