मविप्र मनमाड 12 वी निकाल कला शाखा 92.31 तर वाणिज्य 100 टक्के
मविप्र मनमाड 12 वी निकाल कला शाखा 92.31 तर वाणिज्य 100 टक्के
मनमाड(आवेश कुरेशी):- मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड येथील 12 वी मार्च 2025 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कला शाखेत जाधव ओम विठ्ठल हा 78.50 % गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. पाटील सृष्टी संतोष ही 77.33% सह द्वितीय क्रमांकावर आहे. तर शिंदे शारदा भिमा ही आणि दामले सावन मयाराम हे दोघे ७२.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांकावर आहे.
वाणिज्य शाखेतून देवरे सुविधा बाळू ही 74.67 % गुण मिळवून प्रथम स्थान मिळविले आहे. जाधव कोमल राजेंद्र 73.50% गुण मिळवून द्वितीय क्रमांक वर आहे तर आहेर गायत्री देविदास ही 72.83% गुण मिळून तृतीय क्रमांक वर आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे, नांदगाव तालुका संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे पाटील, व्यस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब साळुंखे, श्री. दामू अण्णा डघळे पाटील, प्राचार्य डॉ. डी. डी.गव्हाणे, कनिष्ठ विभाग समन्वयक प्रा. पी. जी. गवळी, परीक्षा विभाग प्रमुख श्री. आर. डी. ठाकरे व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले.