धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी….


मनमाड(प्रतिनिधी):-  मनमाड  हे रेल्वेचे   महत्त्वपूर्ण जंक्शन स्थानक असून या  स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वे प्रशासनाने मनमाड करांची हक्काची गाडी मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी धुळे दादर ही एक्सप्रेस सुरू केली. धुळे येथूनच गाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मनमाड, लासलगाव नाशिक येथील प्रवाश्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिरिक्त डबे या गाडीला जोडून मनमाड येथे हे डबे खोलण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मनमाड स्टेशन प्रबंधकांना देण्यात आले.मनमाड करांची हक्काची गाडी ही बंद होणार आणि धुळ्याहून गाडी सुरू होणार असे संकेत धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्यानंतर त्या ठिकाणाहून धुळे दादर ही एक्सप्रेस सुरू झाली तर दुसरीकडे या मतदारसंघाच्या खासदार  केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातच नांदगाव तालुका असल्याने या मतदारसंघातील अनेक गाड्या यापूर्वी बंद झाल्या आहेत दुसऱ्या जिल्ह्यातील खासदार त्या मतदारसंघातून नव्याने गाड्या सुरू करत असून मनमाडकरांसाठी नवीन गाडी सुरू होणे तर दूर राहिले  हक्काच्या गाड्या बंद झाल्या आहेत.
धुळ्याहून येणारी गाडी  भरून येत असल्याने मनमाड, व परिसरातील प्रवाशांसाठी तीन अनारक्षित डबे मनमाड मध्येचं खोलण्यात यावे अशी मागणी विभागीय महाव्यवस्थापनका कडे करण्यात आली  असून या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  सुधीर पाटील यांनी दिले. त्यांच्या समवेत मनुभाऊ परदेशी अरविंद  काळे, राजेंद्र करकाळे आदी उपस्थित होते.सदर निवेदन स्टेशन प्रबंधक नरेश्वर यादव स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने धुळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत तातडीने हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी तीन बोग्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहु  असे आश्वासन दिले.
विद्यमान मंत्र्याना माजी मंत्री भारी…!
धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुभाष भांमरे यांनी धुळे येथून नवीन रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली मात्र तेथून मनमाड येथून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यात आली याआधी मनमाड नांदगाव येथून अनेक गाड्या पळवण्यात आल्या असुन अनेक रेलवचे थांबे देखील रद्द करण्यात आले आहे. यामुळे केंद्रीय मंत्र्यांना माजी मंत्री भारी भरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सुधीर पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!