भाजपच्या मनमाड शहराध्यक्षपदी संदीप नरवडे यांची निवड…
भाजपच्या मनमाड शहराध्यक्षपदी संदीप नरवडे यांची निवड…
मनमाड (अजहर शेख):- भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत आज नाशिक जिल्हा उत्तर मधील मनमाड शहराध्यक्षपदी संदीप नरवडे यांची फेरनिवड करण्यात आली आज तशी अधिकृत घोषणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी केली व संदीप नरवडे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.नरवडे यांच्या निवडीची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन जल्लोष केला.
नुकत्याच भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या यात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गुप्त अहवाल मागवून योग्य काम करणाऱ्या आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची विविध पदावर निवड करण्यात आली यात नाशिक जिल्हा उत्तरमध्ये येणाऱ्या मनमाड शहराध्यक्ष पदी संदिप नरवडे यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची घोषणा जेष्ठ नेत्यांनी केली तर नरवडे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन जल्लोष केला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यापूर्वी मनमाड मंडळमध्ये उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करून दोन शहराध्यक्ष नेमण्यात आले होते मात्र काही महिन्यातच एक शहराध्यक्ष निष्क्रिय झाल्याने सर्व धुरा नरवडे यांच्यावर होती यात त्यांनी चांगली जबाबदारी पार पाडली यामुळे वरीष्ठ नेत्यांनी नरवडे यांना पुन्हा एकदा संधी दिली व मनमाड शहराध्यक्ष म्हणून एकच नाव निश्चित करून जाहीर करण्यात आले.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते उमाकांत रॉय,जिल्हा सरचिटणीस संजय सानप,जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ,माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार,कांतीलाल लुनावत नगरसेवक लियाकत शेख,प्रमोद पाचोरकर,प्रदीप थोरात ,दीपक पगारे,नारायण जगताप,किरण उगलमुगले,संजय गांगुर्डे,मुकेश वेलूनू,विजय मिश्रा, मुकुंद एळीजे, रमेश मोरे,बुऱ्हाण शेख,जिल्हा चिटणीस अनिता इंगळे,हिना बागवान,सुनीता पगारे,नाजमा अन्सारी यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.