सचिन दराडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा उपप्रदेशअध्यक्षपदी नियुक्ती…!


  • मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांची भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चा प्रदेशउपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असुन युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यातर्फे ही नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले.
                  आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने आपल्या  पक्षात अनेक संघटनात्मक बदल केले असुन अनेक नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे.मनमाड येथील माजी नगरसेवक विद्यमान भारतीय जिल्हा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांची भाजपा युवामोर्चा प्रदेशउपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असुन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी त्यांना पत्र देऊन नियुक्ती केली.सचिन दराडे यांच्या कामाची पावती म्हणून त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे मत पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.मी आजपर्यंत पक्षाचे प्रामाणिक काम केले व भविष्यात देखील करत राहील पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती मी योग्य पध्दतीने पार पाडेल पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेल व पक्षाने जी संधी दिली तिचा पक्षाला फायदा होण्यासाठी वापर करेल असे मत दराडे यांनी व्यक्त केले. दराडे यांच्या निवडीमुळं राजकीय सामाजिक यासह सर्वच थरातूनत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!