मनमाडच्या बिबट्याचा दरगुडे वस्तीवरून शिख मळ्यात मुक्त संचार…व्हिडीओ व्हायरल
मनमाडच्या बिबट्याचा दरगुडे वस्तीवरून शिख मळ्यात मुक्त संचार…व्हिडीओ व्हायरल
मनमाड(अजहर शेख):- दोन दिवसांपूर्वी मनमाड शहरातील दरगुडे वस्तीवर एका कुत्र्याची शिकार करणाऱ्या बिबट्याने आता आपला मोर्चा वळवला असुन सध्या तो गुरुद्वाराच्या मालकीच्या मळ्यात (शिख मळा) मुक्तपणे वावरताना दिसत आहे गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी व्हिडीओ व्हायरल करून मनमाडच्या जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे काल वनविभागाने दरगुडे वस्तीवर पिंजरा लावला आहे मात्र आज या बिबट्याचे शहराच्याया मध्यवर्ती ठिकाणी आगमन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.