मनमाडला आगीत घराचे नुकसान अग्निशमन दलात कर्मचारीच नसल्याने सफाई कर्मचाऱ्यावर आग विझवण्याची वेळ


मनमाडला आगीत घराचे नुकसान अग्निशमन दलात कर्मचारीच नसल्याने सफाई कर्मचाऱ्यावर आग विझवण्याची वेळ

मनमाड (आवेश कुरेशी):-  मनमाड शहरातील वेलंकनी नगर कॅम्प भागातील पाण्याच्या टाकीजवळ इलेक्ट्रिक डीपी जवळील वाळलेल्या गवताला आग लागून मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागेतील गवताला वनव्यासारखी आग लागली यामुळे येथे असणाऱ्या घरांना देखील याचा फटका बसला चार ते पाच घराला आग लागून अनेक घरातील कुलर फर्निचर व इतर सामान आगीच्या भक्षस्थानी येऊन जळून खाक झाले सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले यात मनमाड नगरपालिकेकडे असलेली अत्याधुनिक अग्निशमन गाडी आली मात्र या गाडीवर कर्मचारीच नसल्याने सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका चालकाची  आग विझविण्यासाठी मदत घेण्याची वेळ आली यामुळे नगरपालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असुन जर अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले वाहन आहेत पण कर्मचारीच नसतील तर काय फायदा असा सवाल सर्वसामान्य मनमाडकरांच्या वतीने विचारला जात आहे. याशिवाय जर भविष्यात जर मोठी आग लागली आणि यात जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement
                 मनमाड शहरातील वेलकांनी नगर कॅम्प भागातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत वाळलेल्या गवताला आग लागली ही आग इतकी भयानक होती की काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण करून आजूबाजूला असलेल्या घरांना आपल्या चपेट्यात घेतले याशिवाय सेंट झेवीयर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात देखील आग पसरली येथील घरातील कुलर फर्निचर जळून खाक झाले येथील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी पाणी वाळू टाकून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले अग्निशमन दलाचे गाडी आली मात्र यावर कर्मचारीच नसल्याने सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी मदत केली मुळात अत्याधुनिक फायर फायटर मशीन असतांना देखील कर्मचारी नसल्याने या गाड्या असून अडचण नसुन खोळंबा अशा गतीत आहे मुळात जर भविष्यात मोठी आग लागली आणि जर अशीच परिस्थिती राहिली आणि यात जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल आता मनमाडकरांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.आजची ही आग कशाने लागली याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी या भागात असलेली डीपीमुळे मागेही आग लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आत्याधुनिक फायर फायटर गाड्या मात्र कर्मचाऱ्यांची वाणवा
मनमाड नगर परिषदेकडे अग्निशमन दलात अत्याधुनिक अशा फायर फायटर गाड्या आहेत छोट्या गल्लीत आग लागली तर या ठिकाणी नेण्यासाठी छोट्या गाड्या व फायर फायटर असणाऱ्या अत्याधुनिक मोटरसायकल देखील आहेत मात्र अग्निशमन दलाच्या विभागात एकही कर्मचारी हा फायर सेफ्टी कोर्स किंवा त्या क्षेत्रातील डिग्री केलेला नाही मुळात अग्निशमन दलाच्या गाडीवर कधी सफाई कर्मचारी तर कधी नगरपालिकेतील इतर कर्मचारी ड्युटी करतात अत्याधुनिक अशा फायर फायटर गाड्या असल्या तरी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वाणवा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!