मनमाडच्या दरगुडे वस्तीवर बिबट्याचे दर्शन, कुत्र्याची अर्धी शिकार करून बिबट्या पसार;  नागरिकांमध्ये भितीचे वातावरण


मनमाडच्या दरगुडे वस्तीवर बिबट्याचे दर्शन, कुत्र्याची अर्धी शिकार करून बिबट्या पसार;  नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मनमाड( अजहर शेख):- मनमाड शहरातील दरगुडे वस्ती हुडको  परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असुन बिबट्याने कुत्र्याची अर्धी शिकार करून पलायन केले आहे या घटनेने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन हे कृत्य बिबट्याचे असल्याचे वनविभागाने देखील मान्य केले आहे यामुळे आता या परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर दहशतीत वावरत आहे वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
                सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे याशिवाय अनेक जंगले तोडण्यात आल्याने वन्यजीव प्राणी हे शहरात येऊन वावरताना दिसत आहे खाण्याची पिण्याची टंचाई निर्माण झाल्याने वन्यप्राणी हे शहरात येऊन आपले पोट भरण्यासाठी शिकार करत आहेत मनमाड शहरातील दरगुडे वस्ती हुडको परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असुन येथे काल रात्री बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली अर्धवट खाल्लेलं कुत्रा सोडुन बिबट्याने पलायन केले आज शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असुन या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह शहरातील इतर नागरिक देखील भयभीत झाले आहे ही शिकार बिबट्यानेच केली असल्याचे मत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले असुन या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी वनविभागाकडे केली आहे.याआधी देखील मनमाड नजीक असलेल्या नागापूर या ठिकाणी बिबट्याची नर मादी जोडी आढळून आली होती तेव्हाही शहरात भीतीचे वातावरण पसरले होते मनमाड शहराच्याया आजूबाजूला मोठया प्रमाणात वनविभागाचे जंगल आहेत मात्र या ठिकाणी आता पाहिजे तसे पाणी आणि शिकार नसल्याने बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचा शहरात मुक्त संचार बघायला मिळत आहे.
बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा…!
मनमाड शहरातील नागापूर याठिकाणी दोन बिबट्याचा मुक्त संचार असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता आता पुन्हा एकदा शहराच्या अगदी नजीक असलेल्या हुडको आणि दरगुडे वस्ती याठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार व शिकार नागरिकांनी बघितले आहे यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी फिरणे अवघड झाले आहे वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!