नांदगावला मुस्लिम बांधवांकडुन आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप ; एकतेचा दिला संदेश
नांदगावला मुस्लिम बांधवांकडुन आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप ; एकतेचा दिला संदेश
नांदगाव(महेश पेवाल):- सध्या देशात मोठया प्रमाणावर जातीवाद फोफावत असताना नांदगाव येथील इकबालदादा सोशल ग्रुप व मुश्ताक शेख मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरबत वाटप कार्यक्रम करून एकतेचा संदेश दिला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असुन देशात जरी जातीवाद वाढत असला तरी नांदगाव तालुका यापासून अलिप्त आहे असेच या कार्यक्रमातुन दिसते या कार्यक्रमाला माजी नगरअध्यक्ष अरुण पाटील माजी नगरसेवक याकूब शेख सामाजिक कार्यकर्ता मुश्ताक भाई शेख फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख सचिव आमिन नवाब शेख मनोज चोपडे जगताप सर संभाजी गायकवाड मुज्जू शेख नसीर खतीब नाहीद शेख रियाज शेख साजिद शाह मोईन शेख जाबीर शहा फरान शेख यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.