डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ओ/ला शाखा मनमाडच्या वतीने उत्साहात साजरी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ओ/ला शाखा मनमाडच्या वतीने उत्साहात साजरी

Advertisement

मनमाड (अजहर शेख):भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, ओपन लाईन शाखा, मनमाड च्या वतीने साजरी करण्यात आली. युनियन कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला एकात्मता, संविधानिक मूल्यं आणि सामाजिक समतेचा प्रेरणादायी संदेश लाभला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉ. शबरीश नायर यांनी भूषविले आणि सूत्रसंचालन कॉ. सुनील सांगळे यांनी प्रभावीपणे पार पाडले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ADEE  सुनील गढवाल  आणि मंडळ कोषाध्यक्ष कॉ. ए. डी. निकम  उपस्थित होते. त्यांचे यथोचित स्वागत कमिटी सदस्य शशिकांत अहिरे, महिंद्र शिंदे, दीपक कुमार आणि वरिष्ठ कार्यकर्ते कॉ. चंद्रशेखर खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच  महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उपस्थित मान्यवरांमध्ये कॉ. विजय शेळके, कॉ. दत्तात्रय शिंदे, कॉ. चंद्रशेखर खैरे, कॉ. भारती कुशवाह, कॉ. हाश्मी साहेब, हर्षल घाटे साहेब, पवार साहेब यांचा समावेश होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप सोनवणे, सुरेश पगारे, सुनील ताडगे, राहुल झाल्टे, दीपक झाल्टे, गोरख झाल्टे, नवनाथ हिंगे, राहुल केदारे, जनार्धन घाडगे, सुखदेव धात्रक, रणजित कुडवे, भास्कर घुगे, आनंद उगलमुगले, गणेश मराठे, किरण बिडगर, वर्षा वायदंडे, लता भोसले, अंजनाबाई कदम, अजिनाथ चव्हाण, दिनेश सोनवणे, श्रावण भांगरे, संजय कोळेकर, अभिरंजन कुमार, रशीद शेख, वाल्मिक भडके, रवींद्र बोराडे, ए ए बोरसे, राकेश शिंदे, जलसिंग मीना, पवन मुंजाळ, उदय कुमार, गौरव कुमार आदींचा उल्लेखनीय सहभाग होता.कार्यक्रमात कॉ. दीपक कुमार, उमेश खैरनार, सोनाली आहेर, हर्षल घाटे साहेब, दयानंद राजनोर साहेब, कॉ. भारती कुशवाह, कॉ. हाश्मी साहेब यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर मनोगत व्यक्त करत सामाजिक समतेचा संदेश दिला.प्रमुख पाहुणे  सुनील गढवाल साहेब (ADEE) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकार नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे महानायक होते. त्यांनी दिलेले मूल्य आजही प्रत्येक भारतीयासाठी दिशादर्शक ठरतात.”कॉ. ए. डी. निकम  यांनी देखील युनियनच्या सामाजिक बांधिलकीवर भर देत बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी कॉ. चंद्रशेखर खैरे यांनी सर्व उपस्थितांचे, मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या युनियन कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.हा कार्यक्रम संविधानिक मूल्यांची जपणूक, सामाजिक सलोखा, आणि युनियन एकतेचे प्रतीक ठरला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, ओपन लाईन शाखा, मनमाड यांच्या एकजुटीने हा कार्यक्रम प्रेरणादायी व यशस्वी ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!