नांदगावच्या उर्दु शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…!
नांदगावच्या उर्दु शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…!
नांदगाव(महेश पेवाल):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नांदगाव येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 7 मध्ये उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शेख अयाज सर वसीम सर सुफियान सर आणि श्रीमती संगीता सोनवणे उपस्थित होत्या.डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाबद्दल चर्चा झाली. मुख्याध्यापक अयाज अहमद यांनी डॉ. आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशावर भर देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. श्रीमती संगीता सोनवणे यांनीही डॉ आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांचा आजच्या काळातही महत्त्व असल्याचे नमूद केले.हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला, आणि डॉ. आंबेडकर यांच्या आदर्शांचा प्रसार करण्यात यशस्वी झाला.