पालिकेच्या वतीने हर घर संविधान अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन
मनमाड( राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगरपरिषद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल 2025 रोजी सकाळी दहा वाजता एकात्मता चौक मनमाड येथे हर घर संविधान या अभियानांतर्गत भारताचे संविधान या विषयावर संविधानाचे मुख्य व्याख्याते श्री तुषार पगारे सर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री फरानदादा खान यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच डी वाय एस पी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक श्री करे तसेच राजाभाऊ अहिरे व राजेंद्र पगारे यांच्या उपस्थितीत आयोजित केला असून सदर कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यासाठी आज मनमाड नगर परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांची बैठक सन्माननीय मुख्य अधिकारी श्री चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले… यावेळी कार्यक्रमासंदर्भात प्राथमिक माहिती सभा लिपिक- किरण आहेर यांनी दिली तसेच मुख्य मार्गदर्शन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री शेषराव चौधरी यांनी केले… यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे देखील मत जाणून घेण्यात आले.
यावेळी मनमाड नगर परिषदेचे कॉम्प्युटर इंजिनिअर श्री दाडगे साहेब, नगरपरिषद अभियंता अनिल गवळी,श्री सोनारे सर,,, आरोग्य निरीक्षक.- वैभव भांबरे सर, सहाय्यक कर निरीक्षक..- मनोज मगर, राजेंद्र पाटील, लेखापाल श्री सतीश सानप व निलेश सपकाळे किशोर अहिरे कैलास पाटील, किशोर व्यवहारे अमोल बागुल तुषार बोराडे, अशोक कटारे सुनील दराडे, भारत वाघ,प्रतीक परदेशी, शिक्षण मंडळाचे मुजिक देशमुख,इतर अधिकारी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते . सदर कार्यक्रमास मनमाड शहरातील नागरिकांनी तसेच विविध विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मनमाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शेषराव चौधरी यांनी केले आहे